दक्षिण सोलापूर: मतदारसंघातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आमदार सुभाष (बापू) देशमुख यांनी तालुक्यातील विविध गावांमधील रस्ते डांबरीकरण, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटार कामांचे भूमिपूजन केले.
आमदार सुभाष देशमुखांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून दक्षिण सोलापूरसाठी कोट्यवधी रुपयांचा विशेष विकासनिधी मंजूर झाला आहे. यामध्ये ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची दुरुस्ती आणि शेती पंपांना सुरळीत थ्री-फेज वीज पुरवठा करण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामांचा समावेश आहे.
"प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि गावे स्वयंपूर्ण बनवणे हेच आमचे राजकारण आहे. निवडणुका संपल्या की आम्ही फक्त विकासाचा विचार करतो," असे प्रतिपादन देशमुखांनी गावबैठकांमध्ये केले.
