लोकमंगल साप्ताहिक - अंक १: समृद्ध गाव अभियान सक्षमपणे राबवणार

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-01-01

लोकमंगल साप्ताहिक - अंक १: समृद्ध गाव अभियान सक्षमपणे राबवणार

आ. सुभाषबापू देशमुख : सांगोला येथे स्नेहसंवाद संपन्न. सांगोला : सोलापूर जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने व सहभागातून समृद्ध गाव अभियान प्रभावीपणे राबवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सहकारमंत्री व दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाषबापू देशमुख यांनी केले. सांगोला येथे आयोजित स्नेहसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.