लोकमंगल साप्ताहिक - अंक ११: मंद्रूप एमआयडीसीच्या पुनर्स्थापनेबाबत आ. सुभाष देशमुख यांनी घेतली उद्योग मंत्री कार्यालयात बैठक

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-03-26

लोकमंगल साप्ताहिक - अंक ११: मंद्रूप एमआयडीसीच्या पुनर्स्थापनेबाबत आ. सुभाष देशमुख यांनी घेतली उद्योग मंत्री कार्यालयात बैठक

दक्षिण सोलापूर तालुक्यातील उद्योग विभागांतर्गत अनेक प्रलंबित विषयांवर उद्योग मंत्री कार्यालयात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे एमआयडीसी पुनर्स्थापना, होटगी येथे लॉजिस्टिक पार्क स्थापन करणे तसेच एमआयडीसीतील मूलभूत सुविधा उपलब्ध करणे यांसह विविध विषयांवर आ. सुभाषबापू देशमुख यांनी सविस्तर चर्चा केली.