पाठपुराव्याला यश! ‘एक राज्य, एक गणवेश’ या निर्णयामुळे सोलापुरातील १५ हजार कामगारांवर आर्थिक संकट ओढवले होते. गारमेंट उद्योग अडचणीत सापडला होता. ही बाब लक्षात घेऊन आ. सुभाषबापू देशमुख यांनी गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. आ. सुभाषबापूंच्या प्रयत्नांना यश मिळाले असून राज्य शासनाने हा निर्णय मागे घेतला आहे.
