उत्तर सोलापूर : सोलापूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाणी असलेल्या, परंतु अरुंद स्थितीत असलेल्या आसरा पुलाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सुमारे ₹३२.८० कोटींच्या निधीतून हे काम हाती घेतले जात आहे. या कामाचे भूमिपूजन अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर आ. सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
