लोकमंगल साप्ताहिक - अंक १६: दुबई येथे टेक्समास संस्थेला सोलापूरमधील प्रतिनिधींची भेट

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-05-14

लोकमंगल साप्ताहिक - अंक १६: दुबई येथे टेक्समास संस्थेला सोलापूरमधील प्रतिनिधींची भेट

दुबई : सोलापूर सोशल फाउंडेशन आणि सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम PAHSUI फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘सोलापूर– दुबई बिझनेस डेलीगेशन’ अंतर्गत, आ. सुभाषबापू देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सोलापूरच्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाने दुबई टेक्सटाईल सिटीतील टेक्समास – टेक्सटाईल मर्चंट्स् ग्रुप ला सदिच्छा भेट दिली. ही संस्था ४०० हून अधिक वस्त्र कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते.