संकल्पना व मार्गदर्शक आ. सुभाष बापू देशमुख, संस्थापक अध्यक्ष, सोलापूर सोशल फाउंडेशन. दुबई : सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक व औद्योगिक शिष्टमंडळाने आ. सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दुबईतील शारजाह येथे असलेल्या शारजाह रिसर्च टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पार्क (SRTIP) चा अभ्यास दौरा केला. या दौऱ्यात नवोन्मेष, संशोधन आणि सोलापूर जिल्ह्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या विविध संधींचा अभ्यास करण्यात आला.
