सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दुबईमध्ये एक विशेष व्यावसायिक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत सोलापूरमधील उद्योजकांचे शिष्टमंडळ आ. सुभाषबापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दुबई दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यासंदर्भात माहिती देण्याकरिता विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
