सोलापूर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ यांच्या हस्ते ‘Fly91’ या विमान कंपनीच्या माध्यमातून सोलापूर विमानतळावरून ‘सोलापूर ते गोवा’ या मार्गावरील नियमित विमानसेवेचा शुभारंभ झाला. या विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले असून हा खरोखरच सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे.
