मुंबई : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे–पाटील यांच्या उपस्थितीत दक्षिण सोलापूर मतदारसंघातील प्रलंबित विविध विषयांसंदर्भात मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत प्रलंबित विविध विषयांच्या संदर्भात आ. सुभाषबापू देशमुख यांनी सकारात्मक चर्चा केली असून ठोस पावले उचलण्यात आली आहेत.
