धुबधुबी तलाव, शिरवळ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ येथील धुबधुबी तलावात उजनी धरणाचे पाणी सोडावे याकरिता सातत्यपूर्ण सुरू असलेल्या आ. सुभाषबापू देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून उजनी धरणातून या तलावात पाणी सोडण्यात आले आहे. या तलावात पाणी सोडल्याने शिरवळ, कणबस आणि इंगळगी या गावांतील हजारो शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
