लोकमंगल साप्ताहिक - अंक २५: चला, एकत्र येऊया आणि सोलापूरचे पर्यटन वैशिष्ट्य जगभर पोहोचवूया !

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-08-06

लोकमंगल साप्ताहिक - अंक २५: चला, एकत्र येऊया आणि सोलापूरचे पर्यटन वैशिष्ट्य जगभर पोहोचवूया !

सोलापूर : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन सप्ताह २०२५ संदर्भातील नियोजन आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बाहेरील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष उपक्रम, भव्य पर्यटन रॅलीचे आयोजन, गावागावात स्वच्छता अभियान यांचा त्यात समावेश आहे.