लोकमंगल साप्ताहिक - अंक ३२: अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना महायुती सरकारचा दिलासा !

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-10-15

लोकमंगल साप्ताहिक - अंक ३२: अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना महायुती सरकारचा दिलासा !

राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना देखील या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून यामुळे अनेक लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुमारे ₹३१,००० कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे.