लोकमंगल साप्ताहिक - अंक ३३: अतिवृष्टीने प्रभावित सोलापूरकरांना न्याय द्या!

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-10-29

लोकमंगल साप्ताहिक - अंक ३३: अतिवृष्टीने प्रभावित सोलापूरकरांना न्याय द्या!

सोलापूर : मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस मुंबई–सोलापूर विमानसेवेच्या शुभारंभ करण्याकरिता सोलापूर शहरात आले असता, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत त्यांच्याशी आ. सुभाषबापू देशमुख यांनी सविस्तर चर्चा केली. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी, पिके, रस्ते आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.