लोकमंगल साप्ताहिक - अंक ३५: हत्तुर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन !

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-11-12

लोकमंगल साप्ताहिक - अंक ३५: हत्तुर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन !

हत्तुर, दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर येथील श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिर देवस्थान येथे एकूण ₹३ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.