लोकमंगल साप्ताहिक - अंक ३७: ‘लोकमंगल’च्या विवाह सोहळयात ५२ जोडप्यांच्या रेशीमगाठी

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-11-26

लोकमंगल साप्ताहिक - अंक ३७: ‘लोकमंगल’च्या विवाह सोहळयात ५२ जोडप्यांच्या रेशीमगाठी

जिल्हा पर्यटन थीममुळे सोहळा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू. वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी अध्यात्मिक क्षेत्रातील महाराजांची उपस्थिती. सोलापूर : रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी लोकमंगल फाउंडेशनतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ५२ जोडपी रेशमी जोडीने व्यासपीठावर दाखल झाली आणि हजारोंच्या उपस्थितीत त्यांच्या मंगल कार्यासाठी रेशीमगाठी बांधल्या गेल्या. हा भव्य सोहळा आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रेरणेतून विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय (डी.एड. कॉलेज) मैदानावर पार पडला.