लोकमंगल साप्ताहिक - अंक ४१: स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपाच अव्वल!

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-12-24

लोकमंगल साप्ताहिक - अंक ४१: स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपाच अव्वल!

महाराष्ट्रात झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जनतेने दिलेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येणे ही जनतेने पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर, पारदर्शक कारभारावर आणि लोकहितासाठी केलेल्या कार्यावर व्यक्त केलेली विश्वासाची पावती आहे.