लोकमंगल साप्ताहिक - अंक ४५: जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा!

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2026-02-04

लोकमंगल साप्ताहिक - अंक ४५: जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा!

कंदलगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंदलगाव येथे प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आ. सुभाषबापू देशमुख यांनी उपस्थित ग्रामस्थांशी थेट संवाद साधत आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत ग्रामीण भागात रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली असल्याचे सांगितले.