लोकमंगल साप्ताहिक - अंक ४६: दुबई–सोलापूर औद्योगिक मैत्रीचे नवे पर्व !

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2026-02-25

लोकमंगल साप्ताहिक - अंक ४६: दुबई–सोलापूर औद्योगिक मैत्रीचे नवे पर्व !

जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज : आ. सुभाष देशमुख — जुळे सोलापुरात कन्सिस्टंट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्सच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन. सोलापूर : दुबई आणि सोलापूर यांच्यात औद्योगिक मैत्रीचे नवे नाते सुरू झाले असून, सोलापूर जिल्हा समृद्ध व्हावा यासाठी उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारवाढीचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले. सोलापूरच्या गारमेंट उद्योगासह इतर स्थानिक उत्पादनांचे जागतिक स्तरावर मार्केटिंग व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.