लोकमंगल साप्ताहिक - अंक ४८: शेतकऱ्यांना आधार आणि सन्मान देण्याची गरज : आ.सुभाष देशमुख

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2026-03-25

लोकमंगल साप्ताहिक - अंक ४८: शेतकऱ्यांना आधार आणि सन्मान देण्याची गरज : आ.सुभाष देशमुख

लोकमंगल प्रथम कृषी राज्यस्तरीय पुरस्काराचे थाटात वितरण. सोलापूर : शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता आणि त्यांच्या सन्मानासाठी प्रत्येक संस्था आणि राजकीय नेत्यांनी पुढे येण्याची गरज आहे. राज्यामध्ये समृद्ध शेतकऱ्यांचा एक समूह तयार केला, तर राज्य आणि देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल. तरुणांनी शेती व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून शेतीचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे, असे मत लोकमंगल समूहाचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.