आशिष शेलार : लोकमंगल साहित्य पुरस्काराचे वितरण. सोलापूर : पुस्तके ही मानवी ज्ञान, विचार आणि संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवणारी सर्वांत महत्त्वाची साधने आहेत. परिपूर्ण जीवन जगण्यासाठी पुस्तक हेच खरे साथीदार असून प्रत्येकाला आपले जीवन समजून घ्यायचे असेल तर त्यांनी साहित्याकडे वळावे, असे मत राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
