भंडीशेगाव : भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील ऐतिहासिक श्रीमंत बाजीराव पेशवे विहीर येथे सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आ. सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. देहू – आळंदी – पंढरपूर या पवित्र पालखी मार्गावर वसलेली ही प्राचीन बारव वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे.
