सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरुळ येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळा पारंपरिक विधींनुसार अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला. यंदाचा हा सलग चौथा सामुदायिक विवाह सोहळा ठरला असून, यामध्ये ७ जोडपी विवाहबद्ध झाली.
