सरकारच्या जलयुक्त शिवार, मुद्रा योजना आणि स्टार्टअप इंडियाचा लाभ सोलापूरच्या तरुणांना मिळवून देण्यासाठी आम्ही सोलापूर जिल्ह्यात ‘लोकमंगल’च्या माध्यमातून इतके दिवस कामे केली. मात्र आता या कामांचा परिघ महाराष्ट्रभर राबवण्यासाठी व जगभरात विखुरालेल्या मराठा बांधवांची साखळी उभारून गावे आत्मनिर्भर करण्यासाठी विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर दक्षिणचे आमदार व माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला.
