सोलापूर : मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आ. सुभाषबापू देशमुख यांच्या सोलापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आ. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक स्वागत करत आदरपूर्वक सत्कार केला. या प्रसंगी त्यांनी त्यांच्याशी विविध स्थानिक विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा केली.
