११ जोडपी विवाहबद्ध ! लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ४८ वा सामुदायिक विवाह सोहळा धाराशिव येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात ११ हिंदू जोडपी विवाहबंधनात अडकली. विवाह सोहळ्यास हजारो वऱ्हाडी मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. लोकमंगल फाउंडेशनने २००६ मध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू केली असून यंदा या उपक्रमाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत.
