सोलापूर : जुळे सोलापूर येथे प्रस्तावित नाट्यगृहाच्या उभारणीसंदर्भात सोलापुरातील विविध नाट्य कलाकार, दिग्दर्शक, साऊंड–लाईट तज्ज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांशी आ. सुभाषबापू देशमुख यांनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत कलाकारांनी सोलापुरातही अत्याधुनिक सुविधा असलेले, दर्जेदार आणि सांस्कृतिक चळवळीला नवे बळ देणारे नाट्यगृह उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली.
