सोलापूर सोशल फाउंडेशन व लोकमंगल फाउंडेशन आयोजित निवासी बालसंस्कार शिबीर वडाळा येथे आयोजित करण्यात आले होते. त्याचा उदघाटन समारंभ आ. सुभाषबापू देशमुख यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. या शिबिरात १५० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले आहेत. लोकमंगल महाविद्यालय परिसरातील राम मंदिर येथे आरती करून शिबिरास सुरुवात करण्यात आली.
