पंढरपूर : विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या माध्यमातून विश्वमंगल मराठी बिझनेस फोरम – पंढरपूरचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आ. सुभाषबापू देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ धनवंत हे ब्रीदवाक्य घेऊन मराठी व्यावसायिकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या फोरमची सुरुवात करण्यात आली. ग्रामीण स्तरावरील व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि व्यावसायिकांना एकत्र आणणे हा या फोरममागील मुख्य उद्देश आहे.
