लोकमंगल साप्ताहिक - अंक ५९: आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधुनिक बाग व्यवस्थापन व विपणन कौशल्यांवरील मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न!

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2026-06-17

लोकमंगल साप्ताहिक - अंक ५९: आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधुनिक बाग व्यवस्थापन व विपणन कौशल्यांवरील मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न!

सोलापूर : कृषी विभाग सोलापूर, आत्मा सोलापूर, महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि विजयराज केशर आंबा फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथे आयोजित आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन आ. सुभाषबापू देशमुख यांनी केले. या कार्यशाळेत आंबा लागवड पद्धती, छाटणी, विरळणी, बाग व्यवस्थापन तसेच उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान याविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.