लोकमंगल साप्ताहिक - अंक ६०: दक्षिण सोलापूरच्या जलसंपदा विषयांसाठी विधानभवनात पाठपुरावा!

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2026-06-24

लोकमंगल साप्ताहिक - अंक ६०: दक्षिण सोलापूरच्या जलसंपदा विषयांसाठी विधानभवनात पाठपुरावा!

विधानभवन, मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन येथे आ. सुभाषबापू देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित व महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी मतदारसंघातील सिंचन प्रकल्प, जलसंधारण कामे, पाणी उपलब्धता तसेच जलसंपदा विभागाच्या विविध विकासकामांबाबत निवेदन देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली.