मंत्रालय, मुंबई : मंत्रालय येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे–पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आ. सुभाषबापू देशमुख यांनी सीना व भीमा नदीवरील बंधारे, बॅरेज, जोडकालवा, देगाव कालवा, तलावांचे बळकटीकरण, पूरप्रतिबंधक कामे, सिंचन सुविधा, जमीन संपादन, रस्त्यांची दुरुस्ती तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
