विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या व्यावसायिक स्वयंरोजगार संवाद बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद. इटकळ : विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या उद्योग विभागातर्फे आयोजित ‘व्यावसायिक स्वयंरोजगार संवाद बैठक’ इटकळ (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे आ. सुभाषबापू देशमुख यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. प्रत्येक संकटाकडे संधी म्हणून पाहण्याची वृत्ती उद्योजकाने जोपासली पाहिजे. सातत्य, अभ्यास, नवनवीन संकल्पना आणि समाजाच्या गरजांचा विचार करून व्यवसाय उभारला, तर यश निश्चित मिळते, असे ते म्हणाले.
