पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त लंडन ते पंढरपूर ‘ग्लोबल वारी’ पंढरीत दाखल झाली. या निमित्ताने विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या वतीने वाडी कुरोली येथील वसंतराव काळे महाविद्यालयात विविध देशांतून आलेल्या वारकरी भाविकांचे आ. सुभाषबापू देशमुख यांनी स्वागत केले. जगभरातील मराठी बांधव आणि वारकरी एकत्र येऊन भक्ती, संस्कृती आणि मराठी अस्मितेचा संदेश देत आहेत, असे उद्गार त्यांनी काढले.
