लोकमंगल साप्ताहिक - अंक ६४: दिवंगत कर्मचारी रमेश बंकट दत्तू यांच्या पत्नीला १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2026-07-29

लोकमंगल साप्ताहिक - अंक ६४: दिवंगत कर्मचारी रमेश बंकट दत्तू यांच्या पत्नीला १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द

लोकमंगल को–ऑपरेटिव्ह बँकेचा कर्मचारी कल्याणाचा आदर्शवत उपक्रम. लोकमंगल को–ऑपरेटिव्ह बँक लि., सोलापूर येथील मंगळवेढा शाखेतील कर्मचारी रमेश बंकट दत्तू यांचे आकस्मिक निधन झाले. या कठीण प्रसंगी बँकेने आपल्या कर्मचारी कल्याणाच्या धोरणाची जपणूक करत दिवंगत कर्मचारी रमेश बंकट दत्तू यांच्या पत्नी श्रीमती सुप्रिया दत्तू यांचा बँकेच्या टर्म पॉलिसी विमा धोरणांतर्गत रु. १० लाखांचा धनादेश सुपूर्द करून कुटुंबाला आर्थिक आधार दिला. हा धनादेश बँकेचे अध्यक्ष तथा आ. सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.