लोकमंगल साप्ताहिक - अंक ६५: विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या ‘संवाद मेळावा २०२६’मध्ये उत्स्फूर्त सहभाग!

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2026-08-05

लोकमंगल साप्ताहिक - अंक ६५: विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या ‘संवाद मेळावा २०२६’मध्ये उत्स्फूर्त सहभाग!

पुणे : पुण्यातील रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या ‘संवाद मेळावा २०२६’ या कार्यक्रमास आ. सुभाषबापू देशमुख उपस्थित राहिले. विविध क्षेत्रांतील उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फाउंडेशनच्या आगामी वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली.