लोकमंगल साप्ताहिक - अंक ६६: मा. देवेंद्रजींशी सोलापूरच्या विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2026-08-12

लोकमंगल साप्ताहिक - अंक ६६: मा. देवेंद्रजींशी सोलापूरच्या विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा

मुंबई : मुंबई येथील ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आ. सुभाषबापू देशमुख यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी निगडित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली. यामध्ये भीमा–सीना जोड कालवा प्रकल्प, कुडल संगम तीर्थक्षेत्राचा विकास, मंद्रूप येथील नवीन बसस्थानक, होटगी येथील आयटी पार्क, जुळे सोलापूर येथे आधुनिक नाट्यगृह आदी विषयांचा समावेश होता.