विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या सोलापूर बिझनेस फोरमचे उद्घाटन; जिल्ह्यात किमान २० फोरम उभारण्याचे आवाहन. सोलापूर : मराठी उद्योजकांना एकत्र आणून त्यांना व्यवसायाच्या नव्या संधी, व्यापक बाजारपेठ आणि मजबूत व्यावसायिक नेटवर्क उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या सोलापूर बिझनेस फोरमची सुरुवात करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी आ. सुभाषबापू देशमुख यांनी उद्योजकांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्याच्या माध्यमातून व्यवसायवाढ साधण्याचे आवाहन केले.
