लोकमंगल साप्ताहिक - अंक ६८: मंत्री दादाजी भुसे यांची शाळांच्या दुरुस्तीबाबत बैठक !

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2026-08-26

लोकमंगल साप्ताहिक - अंक ६८: मंत्री दादाजी भुसे यांची शाळांच्या दुरुस्तीबाबत बैठक !

मंत्रालय, मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्ती व विकास करण्यात यावा, या महत्त्वाच्या मागणीसाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची आ. सुभाषबापू देशमुख यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी बाधित शाळांची तातडीने दुरुस्ती करणे आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी–सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत त्यांनी विनंती केली.