जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे–पाटील; ३० एप्रिलपर्यंत मागितला अहवाल. सोलापूर : गोदावरी नदीवरील बॅरेजेच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात भीमा व सीना नदीवर नवे बरेज बांधण्यासाठी सर्वेक्षण करा. त्याचा अहवाल ३० एप्रिलपर्यंत सादर करा, अशा सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. तसेच पूरसंरक्षण घाट बांधण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश दिले आहेत.
