लोकमंगल साप्ताहिक - अंक ९: सहकारातून गाव समृद्धीकडे जाते – आ. सुभाषबापू देशमुख

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-03-05

लोकमंगल साप्ताहिक - अंक ९: सहकारातून गाव समृद्धीकडे जाते – आ. सुभाषबापू देशमुख

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस आ. सुभाषबापू देशमुख यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. एक सहकारी सोसायटी गावाचे चित्र बदलू शकते व सहकारातूनच गाव समृद्धीकडे जाते, असे मत त्यांनी व्यक्त केले.