राजकीय विशेष अहवाल: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुती व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार सुभाष (बापू) देशमुख यांनी १,१६,९३२ मते मिळवत तब्बल ७७,१२७ मतांच्या विक्रमी फरकाने दणदणीत विजय संपादन केला.
सुभाष बापू देशमुख यांचा सोलापूर दक्षिण मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय असून, त्यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. निकालाची घोषणा होताच सोलापूर शहरात जल्लोष करण्यात आला.